एक कामगार ते यशस्वी उद्योजक पर्यंतचा प्रवास

श्री रविकुमार नागनाथ वंजारे

संचालक वंजारे सर्विसेस प्रा. लि. हिंदवी सेक्युरिटी फोर्स Vanjare’s At HOME Service लवकरच आपल्या सेवेत – Housekeeping material factory

यांचा आज जन्मदिवस एक प्रेमळ – शांत – संयमी व दिलखुलास व्यक्तिमत्व सर्वजण यांना बिग बॉस, भाऊ, वंजारे साहेब या नावाने ओळखतात ते सतत सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आपले नातेवाईक मित्रपरिवार व समाज बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होणारे काळजीवाहू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत.

यांचा जीवन प्रवास म्हणजे एक सामान्य गरीब कुटुंबातून एक कामगार ते एक यशस्वी उद्योजक पर्यंतचा, यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आजपर्यंत 250 ते 300 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या कामाचा विस्तार लातूर – बीड – धाराशिव – परभणी – नांदेड – हिंगोली – छत्रपती संभाजी नगर – पुणे इ. ठिकाणी आहे तसेच यापुढेही संपूर्ण महाराष्ट्रभर कामाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून बीए 2nd year पर्यंतचे झाले आहे. गरीब परिस्थिती व कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही पण याच जबाबदारीमुळे त्यांचा समाजशास्त्र – अर्थशास्त्र व व्यावहारिक ज्ञानाचा चांगला अभ्यास झाला व त्याच्याच जोरावर त्यांनी आज एक कामगार ते यशस्वी उद्योजक पर्यंतचा पल्ला गाठला आहे.

त्यांच्या यशामध्ये वडील स्व. नागनाथ रानबा वंजारे यांचे धाडस, निर्णय क्षमता, व्यक्तिमत्व विकास आई लक्ष्मीबाई नागनाथ वंजारे यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर मेहनत ई. चे बाळकडू मिळाले व तसेच कुटुंबप्रमुख श्री काशिनाथ रानबा वंजारे यांचे व्यावसायिक व कौटुंबिक मार्गदर्शन, बंधू व सहसंचालक श्री युवराज नागनाथ वंजारे युवा सेना जिल्हाप्रमुख लातूर यांची मोलाची साथ मिळाली. यासोबतच श्री लक्ष्मण व्यंकटराव डोंगरे (भाऊजी) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लहान भाऊ Adv. शिवराज नागनाथ वंजारे पत्नी सौ.शितल रविकुमार वंजारे , बहिण सौ. संगीता लक्ष्मण डोंगरे, सौ. प्रीती युवराज वंजारे यांची साथ मिळाली.

यांना आजच्या जन्मदिवशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप प्रगती करा – खूप यशस्वी व्हा आपल्या हातून सर्वोत्तम समाजकार्य घडो ही मनःपूर्वक सदिच्छा.

स्वप्न बघा, त्याचा पाठलाग करा आणि ते सत्यात आणा.

कर्तुत्वाला नेहमीच यश मिळते “.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *